ठाणे : ठाणे परिसरातील डायघर पोलीस स्टेशनबाहेर एका टायरमध्ये अजगर सापडल्याने एकच खळबळ उडाली. 


पोलीस स्टेशनमध्ये अजगर सापडण्याची दुसरी घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र एका कॉन्स्टेबलने प्रसंगावधान राखत त्या अजगराला पकडले आणि जंगलात सोडून दिले. त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जवळपास १० ते १२ फूटी हा अजगर होता. 


यापूर्वी या पोलीस स्टेशनमध्ये सापडला होता अजगर



ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये अजगर सापडण्याची ही दुसरी घटना आहे. १४ जुलै २०१४ रोजी देखील ठाण्यातील घोडबंदरच्या ब्रह्मांड पोलीस स्टेशनमध्ये अजगर सापडला होता. तो अजगर ९ फुटांचा होता, त्यावेळी कॉन्स्टेबल विनोद पाटील यांनी हा अजगर पकडला होता. येऊरच्या जंगलात या अजगरला सोडण्यात आलं होतं.