ठाणे : भिवंडीत धक्कादायक आणि विचार करु शकणार नाही, अशी घटना घडलेय. खुन्नस काढण्यासाठी पहिला प्रेयसीने दुसरीवर बलात्कार घडवून आणला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत असं कसं वागू शकते. हादरवून टाकणारा प्रकार ठाण्यात उघड झालाय. समाजाने विचार करावा असा हा प्रकार पुढे आलाय.सतीश उर्फ भीमराव नकलवार, सलीम मोईन खान, राबिया. नात्यांवरचा विश्वास उडवणारे हे तीन नराधम. त्यातही धक्कादायक म्हणजे एक स्त्री दुसऱ्या  स्त्रोसोबत असं कसं वागू शकते असा प्रश्न पडावा असा प्रकार भिवंडीत घडलाय. सतीश तथा भीमराव नकलवार या प्रियकराचा पिच्छा दुसऱ्या प्रेयसीने सोडावा म्हणून पहिल्या प्रेयसीने दुसरीवर सलीमकरवी बलात्कार घडवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सतीश, सलीम आणि राबियाला बेड्या ठोकल्या आहेत. सतीशने पीडित तरुणीला तीन वर्षांपूर्वी प्रेमात पाडून तिचा गैरफायदा घेतला. या दरम्यान तीन वर्षात पीडित तरुणीचा चार वेळा गर्भपात झाला. सतीशच्या याआधीच्या प्रेयसीला याचा राग येऊन तिने पीडित तरुणीवर सलीम या नराधमाकरवी  बलात्कार घडवला. धक्कादायक म्हणजे या बलात्काराचा व्हीडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसेही उकळले. यात आणखी धक्कादायक म्हणजे सतीश हा विवाहीत आहे. समाजात बदनामी होण्याच्या भितीने पीडित तरुणीने खडवलीच्या नदीत आत्महत्येचाही प्रयत्न केला. मात्र मैत्रीणीने तिला रोखले. पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.