प्रवीण तांडेकर, झी मीडिया, बुलढाणा: कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे मार्गक्रमण आता महाराष्ट्रात होणार आहे. या निमित्तानं ही यात्रा लवकरच शेगाव (Shegav) या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहे. राहूल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत सेलिब्रेटी, सामान्य जनताही सहभागी होते आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या यात्रेचीच चर्चा आहे. सध्या विरोधकही या यात्रेवर कडकडून टीका करताना दिसत आहे. याच पार्श्वभुमीवर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीही राहूल गांधीवर टीका करत त्यांचे मतप्रदर्शन केले आहे. (radhakrishna vikhe patil critises rahul gandhi on bharat jodo campaign saying he should focus more on congress chodo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून ती आज महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यतील शेगाव येथे आली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपेक्षा ज्यांनी काँग्रेस छोडो कार्यक्रम सुरू केला आहे त्यावर लक्ष द्यावे, अशी घणाघाती टीका त्यांनी गोंदिया येथे प्रसार माध्यमांशी (Radhakrishana Vikhe Patil Press Conference) बोलताना केली. 


हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...


यंदा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान राधाकृष्ण विखेपाटीलांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadavis) यांनी सांगितले की लवकरच विस्तार होणार आहे आणि याबाबत जो काही निर्णय असेल तो पक्ष श्रेष्ठी लवकरच घेतील. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिवाळी नंतर विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 


प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करीत असतात अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्य ग्रस्त झाले आहेत.


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


आता जनतेचे त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे ते कोणतेही आरोप करीत असतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची कोणतीही गरज नाही. आता राज्यामध्ये काम करणारी सरकार जनतेच्या मनातील आहे, असं मतंही त्यांनी मांडले. सध्या राज्यभरात मंडिमंडळ विस्तारासोबतच ठाकरे गट आणि शिंदे गट (Shine Sarkar) कोर्टसुनावणीबद्दलही जनमानसात चर्चा आहेत.