1100000000000 चे साम्राज्य तरी अत्यंत साधी राहणी, चालवतात 6 लाखांची कार; मोबाईलही नाही वापरत; कोण आहेत त्यागराजन?
Rama Murthy Thyagarajan Success Story: त्यागराज यांच्या दृष्टीकोनातच त्यांचं यश दडलंय, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
Rama Murthy Thyagarajan Success Story: श्रीराम ग्रुपचे संस्थापक राममूर्ति त्यागराजन हे अरबपती आहेत. असे असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. ते नेहमी सढळ हस्ते दान देखील करत असतात. 1.10 लाख कोटी रुपयांच्या साम्राज्याचे मालक असूनदेखील ते 6 लाखांची कार चालवतात. ते स्वत: मोबाईल बाळगत नाहीत. असे असूनही त्यांची श्रीमंती जगात पोहोचली आहे. 1960 मध्ये त्यांनी छोटी चिटफंड कंपनी म्हणून श्रीराम ग्रुपची पायभरणी केली होती. आज ही एक मोठी संस्था बनली आहे. त्यागराज यांच्या दृष्टीकोनातच त्यांचं यश दडलंय, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
6 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती दान
त्यागराजन यांनी 6 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:साठी केवळ एक छोटे घर आणि कार ठेवली. जवळजवळ सर्व संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बनलेल्या ट्रस्टमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला. 86 वर्षाच्या त्यागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 6 हजार 210 कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. ही संपत्ती त्यांनी कधी दान केली याचा खुलासा झाला नाही.
'मला लोकांच्या आयुष्यातून वाईट काळ घालवायचाय'
मी थोडा वामपंथी आहे. पण संघर्ष करणाऱ्या लोकांच्या आयुष्यातून थोडा त्रास मला कमी करायचाय. विना क्रेडीट हिस्ट्री आणि नियमित इनकम असेल्यांनादेखील कर्ज देणं इतकंही जोखमीचं नाहीय, जे सर्वसाधारणपणे समजलं जातं. आर्थिक सेवांच्या व्यवसायात मी हे सिद्ध करुन दाखवायला आलोय, असे त्यागराजन सांगतात.
क्रेडीट हिस्ट्री न पाहता कर्ज देते श्रीराम ग्रुप
गरीबांना कर्ज देण समाजवादाचा एक भाग आहे. लोकांना कमीत कमी दरात कर्ज मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कर्ज देताना ते घेणाऱ्याचा क्रेडीट स्कोर काय आहे? हे आम्ही पाहत नसल्याचे ते सांगतात. रिपोर्ट्सनुसार, श्रीराम ग्रुप लोन देण्याआधी ग्राहकांचा सिबिल स्कोर पाहत नाही.
1937 मध्ये जन्मले, 1974 मध्ये सुरु केली कंपनी
आर त्यागराजन हे श्रीराम समूहाचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1937 रोजी चेन्नई (तत्कालिन मद्रास) मध्ये झाला. त्यांनी 1974 मध्ये श्रीराम समुहाची स्थापना केली. एवीएस राजा आणि टी. जयरामन हे त्यांच्यासोबत सहसंस्थापक म्हणून जोडेले गेले. सुरुवातीला हा ग्रुप एक चिटफंड म्हणून काम करायचा. पण हळुहळू कंपनीने कर्ज देणे आणि विमा व्यवसायात पाऊल टाकलं. श्रीराम फायनान्स ही भारतातील प्रमुख नॉन बॅंकींग फायनान्स कंपनी आहे. 2013 मध्ये भारत सरकारने त्यागराजन यांना पद्मभूषण पुरस्कारने गौरवले.
श्रीराम समुहात 1 लाखाहून अधिक कर्मचारी करतात काम
सध्या श्रीराम समुहामध्ये 1 लाख 8 हजार कर्मचारी काम करतात. श्रीराम फायनान्स, श्रीराम हाऊसिंग फायनान्स, श्रीराम जनरल इंश्योरन्स, श्रीराम इनसाइट, श्रीराम फॉर्च्यूनस श्रीराम एएमसी, श्रीराम वेल्थ आणि श्रीराम प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे.