मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ट्विटरवरून राष्ट्रद्रोही म्हटलं होतं. हे ट्विट राहुल गांधींना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. भोईवाडा न्यायालयानं मुंबई पोलिसांना या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटच्या विरोधात सातंत्र्यवीर स्मारक समितीनं भोईवाडा कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने राहुल गांधी यांच्या या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांची चौकशी मुंबई पोलिस करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शिवसेनेची टीका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काँग्रेसने किती द्वेष् केला तरी सवरकर संपणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. विक्रम संपथ यांनी लिहलेल्या सावरकर यांच्यावरील 'इकॉस फ्रॉम अ फरगॉटन पास्ट' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी नीलम गोऱ्हे, भारत कुमार राऊत, रणजित सावरकर उपस्थित होते. 


काँग्रेसने किती द्वेष् केला तरी सवरकर संपणार नाही तर पुन्हा कधी मणिशंकर अय्यर आला तर त्याला जोड्याने मारू असा इशारा ही देण्यात आला आहे. सावरकरांवरचे पुस्तक हे इंग्रजीत असल्याने द्वेष कमी होण्यास मदत होणार आहे तर इतर भाषेत ही हे पुस्तक छापण्यात येणार आहे.