नांदेड : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या सभेत पंतप्राधन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्योगपतींना द्यायला सरकारकडे ६५ हजार कोटी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांना द्याला सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सत्तेवर आल्यापासून शेकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षात ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राहुल यांनी केला. रोजगाराच्या प्रश्नावरही त्यांनी मोदींना लक्ष्य केले.


गेल्या सात वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी सध्या असल्याचा आरोपही त्यांनी केला. नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मराठवाड्याचा दौरा केल्याचं बोलले जात आहे.