पुणेः MPSC उत्तीर्ण दर्शना पवार हत्या (Darshna Pawar Case) प्रकरणात आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore) याला अटक करण्यात आली आहे. राहुल हा सध्या पोलिस कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान राहुल हांडोरेने दर्शनाची हत्या कशी केली? याचा खुलासा केला आहे. तसंच, अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचंही त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. (Darshna Pawar Case Update In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. पोलिसांनी थोडी चौकशी केल्यानंतर दर्शनाची ओळख पटली होती. तसंच, ती मित्र राहुल हांडोरेसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचं समोर आलं होतं. मात्र, राहुलही 12 जूनपासून बेपत्ता होता. त्यामुळं पोलिसांचा राहुलवर संशय बळावला होता. बेपत्ता राहुलला शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या नंबरवरु त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर अखेर 21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक केली आहे. 


दर्शनाच्या गळ्यावर वार


शवविच्छदन अहवालात दर्शना पवारच्या गळ्यावर वार केल्याचे आढळले होते. पोलिसांना नेमके हे वार कशाचे आहेत याचा अंदाज येत नव्हता. राहुल हांडोरेला अटक केल्यानंतर अखेर या गोष्टीचा उलगडा झाला आहे. राहुलने त्याने दर्शनाला कसे संपवले याचा कबुलीजबाब दिला आहे. राहुल आणि दर्शना राजगडावर गेल्यानंतर त्यांच्यात लग्न या विषयावरुन वादा-वादी झाली होती. त्यानंतर राहुलने तिच्यावर कटरने तिच्या गळ्यावर तीन ते चारवेळा वार केले आणि त्यानंतर डोक्यात दगडाने मारहाण करुन तिची हत्या करण्यात आली. आरोपी राहुल हंडोरे यानं स्वतः याबाबत कबुली दिल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र, हे सगळे माझ्या हातून अनावधानाने घडले, असंही त्याने पोलिसांकडे स्पष्ट केल्याचं बोललं जातंय. 


राहुलने दर्शनाची हत्या का केली?


दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याची माहिती समोर आली. राहुल हा दर्शनाच्या कुटुंबीयांना लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र, कुटुंबीयांना त्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल बैचेन होता. त्याने दर्शनाला फिरायला जाऊ असे सांगून राजगडावर नेले आणि तिथे तिची हत्या केली. असे तपासात पुढे आलेय. 


कोण आहे राहुल हांडोरे?


राहुल हांडोरे हाही एमपीएससीची (MPSC) तयारी करत होता. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो पार्टटाईम जॉब करुन परीक्षा देत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस साठी पार्टटाईम जॉब करत होता. 2023 सालची एमपीएससीची प्रीलीमीनरी परीक्षा त्याने दिली होती.