Harihareshwar Beach Crime: महाराष्ट्रातील विविझ जिल्ह्यांमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत.येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत येऊन स्थळांवर धिंगाणा घालतात. तिथलं पावित्र्य घालवतात. रायगड येथील हरिहरेश्वर मंदिराजवळ मद्यधुंद पर्यटकामुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. कसा घडला हा प्रकार? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिहरेश्वर मंदिर परिसरात स्कॉर्पिओने एका महिलेला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुण्यातून काही पर्यटक कोकणात श्री दक्षिणकाशी क्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले होते. ते विश्रांतीठी हॉटेलच्या शोधात होते.  हरेश्वर मंदिर परिसरात जेवण, राहण्याची व्यवस्था करणारे अनेक हॉटेल्स आहेत. दरम्यान पुण्यातील पर्यटक हरेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक अभी धामणस्कर त्यांच्या हॉटेलमध्ये रूममध्ये पोहोचले. येथे त्यांनी राहण्याची व्यवस्था होईल का? अशी विचारणा केली. 


मध्यरात्री एक वाजून 30 मिनिटे झाली होती.रुमबद्दल चर्चा सुरु असताना दरावरुन हॉटेल मालक आणि पर्यटक यांच्यात वाद झाला. पुण्याहून आलेले पर्यटक दारूच्या नशेत होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी हॉटेल व्यवसायिक अभी धामणस्कर यांना मारहाण केली. पर्यटक एवढ्यावरच न थांबले नाहीत. वाद घालून झाल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढायच्या तयारीत होते. ते स्कॉर्पिओतून निघाले असता अभी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर हिला त्यांनी स्कॉर्पिओ खाली चिरडले. 


या घटनेतच ज्योती धामणस्कर यांचा मृत्यू झाला. अभी धामणस्कर यांनी स्कॉर्पियो चालकाविरोधात पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असता एकजण पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावरुन पळ काढला. श्रीवर्धन पोलीस या आरोपींचा आता शोध घेत आहेत.