COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या महाड औद्योगिक वसाहत दुपारच्‍या सुमारास स्‍फोटांच्‍या मालिकेने हादरली . दुपारी एक वाजण्‍याच्‍या सुमारास प्रिव्‍ही ऑरगॅनिक कंपनीत रिअॅक्‍टरचा स्‍फोट होवून आग लागली . पाठोपाठ स्‍फोटांची मालिकाच सुरू झाली आणि आग भडकत गेली .  आगीच्‍या ज्‍वाळा आणि धुरांचे लोट दूर ८ ते १० किलोमीटरपर्यंत दिसत आहेत . जवळपास १६ ते १७ स्‍फोट झाले असून या आग आणि स्‍फोटांच्‍या मालिकेत जीवीतहानी झाली असण्‍याची दाट शक्‍यता आहे. 


कंपनी या आगीत बेचिराख झाली असून दोनशेहून अधिक दुचाकी आणि  पन्नासहून अधिक चारचाकी वाहने आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडल्‍या आहेत.  या घटनेने परीसरात घबराट पसरली आहे. एमआयडीसीकडे येणारे सर्व मार्ग नागरीकांसाठी बंद करण्‍यात आले आहेत.  महाड नगरपालिका व एम आय डी सीचे अग्नीशमन दल घटना स्‍थळी पोहोचले असून आग विझवण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्‍न सुरू आहेत . परंतु हायड्रोजन गॅस मोठया प्रमाणावर बाहेर पडल्‍याने आगीवर नियंत्रण मिळवण्‍यात यश येत नाही. शिवाय परीसरातील नागरीकांना  डोळे चुरचुरणे , आग होणे असे त्रास व्‍हायला सुरूवात झाली आहे . या आगीची झळ शेजारच्‍या देवा ड्रील कंपनीलाही बसली आहे.