रायगड पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव, 60 जणांना लागण
Coronavirus in Raigad : रायगड पोलीस (Raigad police) दलातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे.
अलिबाग : Coronavirus in Raigad : रायगड पोलीस (Raigad police) दलातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील 6 पोलीस अधिकारी आणि 54 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Raigad police force has 60 staff and officers corona positive)
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोल दुधे यांचाही समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
एवढया मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे. तसेच विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.