Dahanu Nashik Railway: नाशिक आणि डहाणू दरम्यान नव्या मार्गिकेच्ये सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 100 किमीची लाईन त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमधून मार्गक्रमण करणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळं दोन शहरातील अतंर कमी होणार आहे. तसंच, कनेक्टिव्हीटीदेखील वाढणार आहे. तसंच, या प्रादेशिक वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक देवाण-घेवाणदेखील अधिक सुलभ होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. या स्थळाला ऐतिहासिक आणि सांस्कृतीक महत्त्व आहे. तसंच, नाशिक जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत. तसंच, पंचवटी येथेही दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. नाशिकमध्ये लाखो भक्त भेट देत असतात. या रेल्वे मार्गामुळं नाशिकला आणखी एक शहर जोडले जाणार आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे. पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील अंतरही कमी होणार आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम स्थान सर्वेक्षण करण्याचा निर्णय नियोजन आणि व्यवहार्यता अभ्यासानंतर घेण्यात आला आहे . भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय प्रभाव आणि खर्च यासर्व घटकांचा विचार करुनच सर्वेक्षण रेल्वे मार्गासाठी सर्वात योग्य मार्गाचे मूल्यांकन करेल. या रेल्वे मार्गामुळं ग्रामीण विकासाबरोबरच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. 


सर्वेक्षणामध्ये रेल्वेचा नेमका मार्ग कुठून जाणार त्याची जोडणी कशी असणार, आवश्यक जमीन अधिग्रहण, पुलांचे ठिकाण या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यात येणार आहे. लवकरच सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर बांधकाम नियोजनासह प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या रेल्वेमार्गामुळं प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे तसंच, रेल्वेला चालना देखील मिळणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार, सफाळा, वैतरणा, पालघर, बोईसर, डहाणू येथील भाविकांना आता डहाणू येथून थेट नाशिकला रेल्वेने जाता येणार आहे. हा मार्ग अंबड व सातपूर या औद्योगिक वसाहतीजवळून गेला तर त्याचा फायदा कंपन्यांनाही होणार आहे.