नवी दिल्ली : रेल्वेने विना तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यावधींची वसुली केली. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार २०१९-२० मध्ये रेल्वेने १ कोटीहून अधिक प्रवाशांना पकडण्यात आलं होतं. यांच्याकडून ५६१.७३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ ते २०२० दरम्यान विना तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून १ हजार ९३८ रुपये वसूल करण्यात आले. तर २०१६ पेक्षा ३८.५७ टक्के अधिक आहे. रेल्वेने २०१६-१७ मध्ये ४०५.३० कोटी रुपये वसूल केले.  तर २०१८-१९ मध्ये ५३०.०६ कोटी रुपये कमावले.


२०१९-२०२० मध्ये एक कोटी दहा लाख प्रवाशी विना तिकिट प्रवास करताना पकडले गेले. विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नियम बनवले आहेत. अशा प्रवाशांकडून किमान २५० रुपये वसूल केले जातात. 



जर कोणी दंड देण्यास नकार दिला तर प्रवाशाला आरपीएफकडे दिले जाते. त्याच्या विरोधात रेल्वे अधिनियम कलम १३७ गुन्हा दाखल केला जातो. 


यानंतर कोर्टात त्या व्यक्तीवर एक हजारपासून पुढे दंड लागू शकतो. तरीही विरोध केल्यास ६ महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.