मुंबई : राज्याच्या बहुतेक भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला. घरांमध्ये, पिकांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. नुकताच हवामान खात्याने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा दिला आहे.


राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक झाला आहे. वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अंदाज खरे ठरले आहेत. त्यानुसार प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. या दरम्यान काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या क्षेत्रामुळेही राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.