बीड : जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी रात्री तुरळक पाऊस झाला. या पावसाने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात चांगलेच पाणी वाहत आहे. बीडनजीक असलेल्या नामलगाव येथे नदी पाण्याची पुजाकरण्यात आली. अनेक दिवसांपासून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीडवासियांना शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान बीड दारू आणि माजलगावच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. बीड पासुन जवळच असलेल्या नामलगाव आणि परिसरात एक मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल अर्धा ते एक तास झालेल्या पावसामुळे बीड जवळून वाहणाऱ्या करपरा नदीपात्रामध्ये पाणी वाहू लागले. 


नामलगाव येथील गणपती मंदिराच्या मागून वाहणाऱ्या या नदीत आलेल्या पहिल्याच पाण्याचे पूजन संस्थानचे पुजारी आणि नागरिकांनी मोठ्या मनोभावे केले तर प्रादेशिक परिवहन कार्यालयात जवळून वाहणाऱ्या नदी पात्रावर या पडलेल्या पावसामुळे अचानक फेस आला होता. हा फेस जणूकाही बर्फ असल्याचा अनुभव देत होता. या भागामध्ये दरवर्षी पाऊस आल्यावर अशाच पद्धतीने पात्रावर आणि पाण्यावर फेस येतो. मात्र त्याचे अद्याप तरी कारण समजू शकलेले नाही. बीडमध्ये पावसाची सुरुवात झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा सुखावला आहे.