चंद्रपूर : जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वीस दिवसांच्या ब्रेकनंतर आलेल्या पावसाने धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी आणि नागभीड भागात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ ते २० दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं धान उत्पादक शेतक-यांनी शेतीकामाला सुरुवात केली होती. त्यानंतर  मात्र पावसानं दडी मारल्यानं चंद्रपूर जिल्ह्यात पेरणीची कामं खोळंबली होती. यामुळं शेतक-यांचे डोळेआकाशाकडे लागले होते. अखेर २० दिवसानंतर पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावत शेतक-यांच्या पल्लवित केल्या आहेत.


१ जून ते १८ जुलै २०१७ या कालावधीत आतापर्यंत २८०.६६ मिमी सरासरी पाऊस पडला आहे. आजचा सर्वाधिक पाऊस नागभीड आणि ब्रम्हपुरी भागात पडला असून पाणी निचरा होण्याची व्यवस्था नीट नसल्यानं नागभीडच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी नजरेस पडले.