Heavy Rain In Sangli :  राज्य भरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऐन दिवाळीत धो धो पाऊस पडत आहे. सांगलीत ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे,  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीच्या वाळवा तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला.. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आलाय. या पुरामुळे आष्टा-वाळवा रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सांगली जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झालाय.. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. 


राज्यभरात थंडीची चाहूल 


राज्यभरात थंडीची चाहूल लागलीय.. अनेक ठिकाणी तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे..उत्तरेकडून येणा-या थंड वा-यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागलीय...   तर दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात अद्याप ढगाळ वातावरण आहे...  त्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाची ही शक्यताय...