मुंबई :  heavy rain in Maharashtra : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आज सकाळपासून मुंबईसह कोकणात आणि विदर्भासह मराठवाड्यात चांगला पाऊस कोसळत आहे. राज्यात प्रामुख्याने कोकणसह पालघर, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव पुढील तीन ते चार तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तास अधूनमधून तीव्र पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट आणि आसपासच्या कोकणातील काही भाग पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.


कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असताना विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला होता. मात्र राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात अनेक भागांत हलक्या सरी ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हवामान विभागाने सातारा आणि पुणे जिल्ह्यात उद्या सकाळपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी केलाय. तर संपूर्ण विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाचा अलर्ट  दिलाय.



कोकणात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. आता पुन्हा आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात जोरदार पावसाची व्यक्त करण्यात आली आहे. समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे