मुंबई / रत्नागिरी : Rain in Konkan वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. ( Chiplun city was flooded) चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे.  (Rain in Chiplun)  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी दापोलीलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. (Rain in Dapoli) सध्या पाणी ओसरलं असलं तरी पावसाची संततधार सुरूच आहे. दुपारी पुन्हा भरती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा पाणी साचणार नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणपती उत्सवात नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.


बाजार पुलावर पाणी आल्याने भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Rain in Chiplun) वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिपळूण नगरपरिषदेनेही धोक्याचा इशारा दिला आहे. 



दरम्यान, रात्री चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. बाजार पुलावरून पाणी जाऊ लागले आहे. नाईक कंपनी येथून बाजारपेठेत पाणी शिरू लागले आहे. पुराचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दापोली तालुक्यात ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळत आहे. केळसरकर नाका येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. (Rain in Dapoli) रात्री दहा वाजताच पाणी साचले होते. (Torrential in Konkan,  Chiplun and Dapoli city in flooded)



रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता 


येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलंय. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात भाविक गणेशोत्सवासाठी जाच आहेत. त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


दापोलीत ढगफुटी सदृश पाऊस, रात्रभर मुसळधार


दापोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोली बाजापेठ,केळस्कर नाका,तहसील कार्यालयात पाणी साचलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पुरतं विस्कळीत झालयं. दापोलीकरांना अख्खी रात्र जागून काढावी लागली आहे. दापोलीत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.