Rain Alert : या तीन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
मुंबईसह कोकण आणि ठाण्यात ही मुसळधार पाऊस होतो आहे.
मुंबई : रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तर रत्नागिरी आणि रायगडसाठी पुढील 3 दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात अनेक दिवसापासून दडी मारुन बसलेल्या पावसाला काही भागात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात ही पावसाचा जोर कायम आहे.
कोल्हापूर, अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस होतोय. येथे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 6 फुटांनी वाढ झाली आहे.
अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईत ही मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मंदावली आहे.