Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मराठा संघटनांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या स्थापनेपासून मनसेची आरक्षणावरील भूमिका एकच आहे. असं त्यांनी या वेळी म्हटलं आहे. 


राज ठाकरेंकडून अजित पवारांची पाठराखण


मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील एक विधान केलं आहे. अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. अजित पवार यांनी कधीच जातीवर भाष्य केलं नाही. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 


आरक्षणाची गरज नाही विधानावर स्पष्टीकरण 


सोलापूरमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होते की, आरक्षणाची गरज नाही. या वक्तव्यावर आज राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सोलापूरला जे बोललो ते सगळ्यांनी पाहिलं. जाणीवपूर्वक बातम्या केल्या. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही भूमिका मनसेच्या स्थापनेपासूनच आहे. तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं कारण की राज्यात संधी उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातील संधी या बाहेरच्या तरुणांना मिळतात. महाराष्ट्रातील स्थानिकांना मिळत नाहीत. त्यामुळे या संधीचा योग्य वापर झाला तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. असं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल


मनोज जरांगे यांनी मागून जे राजकारण सुरु केल आहे ते मतं मिळवण्यासाठी केलं आहे. त्यामुळे माझी मराठा-ओबीसी समाजाला विनंती आहे की या लोकांच्या नादी लागू नका. सध्या लहान मुलं देखील जातीवर बोलू लागली आहेत. त्यामुळे सगळा चिखल झालाय. मनोज जरांगेंच्या आडून ठाकरे गटाचं विधानसभेसाठी राजकारण सुरु आहे. आपल्याकडे जातीचं राजकारण करून माथी भडकवली जात आहेत.  त्यामुळे निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे देखील पवारांचे प्रयत्न आहेत. असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.