डोंबिवली :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध नकलांसाठी प्रसिद्ध आहे, ते तापट आहेत त्या कोणावरही लगेच चिडतात. पण त्यांचा आज मिश्किल स्वभाव पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवलीतील मनसे  नगरसेवकांच्या भेटीसाठी राज ठाकरे गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेपूर्वी छायाचित्रकारांनी राज ठाकरे यांचे फोटो घेण्यास सुरूवात केली. त्यात एका चॅनलचा कॅमरामन व्हिडिओ शूट करत होता. 


 



राज ठाकरे यांनी त्याच्याकडे पाहिले आणि थेट त्या कॅमरामनच्या समोर खुर्ची टाकली आणि त्याला कर आता शूट असे सांगितले. मग काय पत्रकार परिषदेत एकच खसखस पिकली. बराच वेळ मनसे नेते, पत्रकार, कॅमरामन आणि छायाचित्रकार खो खो हसत होते. 


नंतर राज ठाकरे यांनी काय आहे... असे म्हणून पत्रकार परिषदेला सुरूवात केली. पण त्यापूर्वी काही काळ पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ होता.