Raj Thackeray On  Sharad Pawar :  अजित पवार यांचा मोठा गट शिंद फडणवीस सरकार मध्ये सामील झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सुरुवात शरद पवारांनी केली, शेवटही तेच करतील असे राज ठाकरे म्हणाले. तसेच अजित पवारांसह गेलेल्या  3 नेत्यांचा सहभाग संशयास्पद वाटत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. 


राज्यात किळसवाणे राजकारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. मनसेच्या मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे झालयं ते अत्यंत किळसवाणे आहे. राज्यात किळसवाणे राजकारण सुरु आहे.   प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळत आहेत. 


फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली


या सगळ्याची म्हणजेच फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनी केली. 1978 साली शरद पवार यांनी याचा पहिला प्रयोग केला. याआधी महाराष्ट्रात कधीच असं झालं नव्हत.  सुरुवात शरद पवारांनी केला. शेवट ही शरद पवार यांच्यावरच  झाला. यामुळे जे काही घडलं आहे त्याला शरद पवार जबाबदार आहेत.


3 नेते संशयास्पद वाटतात


अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील ही अजित  पवारांसह जाणारी माणसे आहेत अस मला वाटतं नाही. ही 3 माणसं मला संशयास्पद वाटतात. ही गोष्ट अचानक घडलेली नाही. कित्येत दिवस ही गोष्ट वातावरणामध्ये चालू होती. 


दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?


दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी कोणतीही मागणी अथवा चर्चा मनसेच्या बैठकीत झालेली नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. घडाळ्याने काटा काढला की काट्याने घड्याळ काढले हेच समजत नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य केले.  


सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही


राज्याचं राजकारण अत्यंत किळसवाणं झालंय. स्वार्थासाठी वाट्टेल त्या तडजोडी केल्या जातायेत अशा शब्दात राज ठाकरेंनी आसूड ओढले आहेत. पाठवल्याशिवाय कुणी जात नाही असं सांगत त्यांनी शरद पवारांकडेही अप्रत्यक्षपणे बोट दाखवलंय. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही अस राज ठाकरेंनी म्हंटलंय.