पुणे : Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होत आहे. मात्र, मनसेत अंतर्गत वाद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. (Vasant More aggressive) मनसेचे पुण्यातील कात्रज भागातील नेते वसंत मोरे यांच्या नाराजीनाट्यामुळे महिन्याभरापूर्वी पक्षात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून आले. त्यानंतर वसंत मोरे यांची राज यांनी नाराजी दूर केली होती. मात्र, अद्याप धुसफूस सुरुच आहे. राज सभेआधी मोरे यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि चर्चा केली. आता त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, झारीतील शुक्रचार्य कोण? आम्ही जेलवाऱ्या केल्या आहेत. साहेबांनी एक आदेश दिला तरी आम्ही जेलमध्ये जाणारे आहोत.


राज सभेआधीच वसंत मोरे यांचा गनिमीकावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत मोरे यांना तडकाफडकी पुणे शहर अध्यक्षपदावरुन बाजूला करण्यात आले. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड करत त्यांच्यावर शहरची जबाबदारी सोपवली. आज राज ठाकरे यांची सभा होत आहे. त्याआधी मोरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. वसंत मोरे हे शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन लाईव्ह येत पक्षातील झारीतल्या शुक्राचार्यांना दूर केलं पाहिजे, असं म्हटलं होते. झारीतील शुक्रचार्य कोण? आम्ही जेलवाऱ्या केल्या आहेत. साहेबांनी एक आदेश दिला तरी आम्ही जेलमध्ये जाणारे आहोत, असे म्हटले. त्यामुळे मनसेतील खदखद सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.


 मला राज ठाकरे यांनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे. मला वाटते पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो.  पक्षात मतभेद असतात. पण आता मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय, असे ते म्हणाले.