Raj Thackeray, Mumbai News: प्रभादेवी येथे तेजपर्व या संस्थेने युपीएससी (IAS Officers) आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी कानमंत्र दिलाय. पंतप्रधानांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम असेल तर तुम्हालाही असू दे, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक किस्सा देखील सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कुठंही गेलात तरी तुमच्या मनात आपल्या राज्याबद्दल आदर असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हालाही असलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राप्रती तुमच्या मनात स्वार्थ असला पाहीजे, असं सांगत असताना त्यांनी 2001 सालचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्री होते. 


बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं.  मी नाही आहे तर तुम्ही बोलून घ्या, असं विलासरावांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. समोरचा अधिकारी दाक्षिणात्य होता. बैठकीत अधिकाऱ्यांनी बसल्यापासून नकाराचा पाढा सुरू केला. शिष्टमंडळाने एकूनच नाराजीचा सुर लावला. जमिनीचा ताबा आणि इतर गोष्टींना वेळ लागेल, असं म्हणत बैठक उठली. अधिकाऱ्याने गेम केला. तमिलनाडूच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यासाठी सांगितलं आणि अशाप्रकारे कारखाना तमिलनाडूला गेला, असं राज ठाकरे यांना सांगितलं.


पाहा Video



दरम्यान, ज्याला दहावीत 42 टक्के पडलेत, तो आज आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मंत्रालयातील एक किस्सा देखील सांगितला. तुम्ही पर्मनंट आहात, मुख्यमंत्री टेम्पररी आहे, त्यामुळे तुमची ताकद ओळखा, असं राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.