राज ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपनं मोठंमोठी स्वप्न दाखवली असली तरी अच्छे दिनाचा फुगा लवकरच फुटणार असल्याची खिल्ली त्यांनी उडवलीय. तसंच गुजरातमध्ये जनतेनं भाजपकडे पाठ फिरवल्याचा दावाही त्यांनी केलाय. मात्र तरीही भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर त्याचं श्रेय मशिन्सना द्यावं लागेल असा टोला राज ठाकरेंनी हाणलाय. तर दुसरीकडे मुंबईतली रेल्वे स्टेशन्स फेरीवाल्यांपासून मनसेनं मुक्त केल्याचाही दावा त्यांनी केला. मनसे करू शकते तर मग प्रशासन का करू शकत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.