Rajashree Shahu Maharaj Birth Anniversary: समाजामध्ये समरसता, सहिष्णुता आणि विज्ञानवाद रुजवण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करणारे आधुनिक भारतातील एक अग्रगण्य नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज! (Rajashree Shahu Maharaj) शाहू महाराजांचे जीवन आणि सुधारणावादी विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती (Rajashree Shahu Maharaj Birth Anniversary). आजच्या दिवशीच कागलमध्ये 1874 साली राजर्षी शाहूंचा जन्म झाला होता. राजर्षी शाहूंचा समाजकार्याचा वसा फार मोठा आहे. समाजातील सर्व स्तरामधील लोकांना शिक्षण आणि मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शाहूंनी फार काम केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशाच प्रकारचा एका व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शेअर केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या  (Balasaheb Thackeray) एका जुन्या मुलाखतीमधील हा व्हिडीओ असून राजर्षी शाहू आणि प्रबोधनकार ठाकरेंचं (Prabodhankar Thackeray) ​नातं कसं होतं हे या व्हिडीओत बाळासाहेब सांगताना दिसत आहेत.


त्यांना दादरला आणलं होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राजर्षी शाहू महाराजांनी प्रबोधनकार ठाकरेंवर पुत्रवत प्रेम केलं... स्वर्गीय बाळासाहेबांकडून ऐका महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वातील तगड्या माणसांचे ऋणानुबंध," या कॅप्शनसहीत मनसेनं बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे, "दादांना फार दु:ख झालं (राजर्षी शाहूंचं निधन झालं तेव्हा). त्यांचं तिथे काहीतरी पन्हाळा लॉज आहे दादरला तिकडे आणलं होतं बरं नसल्याने. सकाळची गोष्ट आहे, दादा त्यांना भेटून गेले होते.  डॉक्टरांनी महाराजांना सांगितलं होतं की बोलायचं नाही. तर ते डॉक्टरांना म्हणाले मी बोलतोय कुठं मी प्रश्न विचारतोय. आता त्यांनी उत्तर द्यायचं. त्यांचं असं तिथल्या तिथं चालायचं," असं सांगितलं.


मागासवर्गीय बहुजन समाजावर असलेला एक सर्च लाईट


तसेच पुढे बोलताना बाळासाहेबांनी राजर्षी शाहूंचं निधान झालं त्या दिवशी काय घडलं याबद्दल सांगितलं. "आईने उठवलं वडिलांना. म्हणाली, अहो उठा उठा रस्त्यात गर्दी दिसतेय. महाराज गेल्याची बातमी आहे. दादा खाडकन् उठले. तोंड धुतलं चहा वगैरे तसाच ठेवला आणि गेले. बातमी खरी होती. मागासवर्गीय बहुजन समाजावर असलेला एक सर्च लाईट आज गेला, अशी दादांची पहिली प्रतिक्रिया होती. अशा तऱ्हेने ते दुरावले. दादांनी त्यांचा फार मान, आदरार्थ राखला. त्यांच्यात फार मैत्री होती. त्यांनी दादांवर पोराच्यापलिकडे प्रेम केलं. अगदी अपार. अशी ही तगडी माणसं होती. इंग्रजीत म्हणतात तसं, दे वेअर जायंट्स. अता तगडी माणसं मिळणार नाही. हे केवळ कोल्हापूर, महाराष्ट्राचं नाही तर देशाचं दुर्देव आहे. मी त्यांना साष्टांग नमस्कार करतो," असं बाळासाहेब हात जोडून म्हणतात. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
 



सोशल मीडियावर सर्वच राजकीय पक्षांनी आणि अनेक नेत्यांनी राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.