राजधानी सातारा हाफ हिल मॅरेथॉनला सुरुवात
राज्यासह देशात हाफ मॅरेथॉनसाठीचा अवघड असा समजला जाणारा ट्रॅक म्हणजे 21 किलोमीटरचा राजधानी सातारा हाफ हिल मॅरेथॉनचा..आज या स्पर्धेला सकाळी सुरूवात झाली.
सातारा : राज्यासह देशात हाफ मॅरेथॉनसाठीचा अवघड असा समजला जाणारा ट्रॅक म्हणजे 21 किलोमीटरचा राजधानी सातारा हाफ हिल मॅरेथॉनचा..आज या स्पर्धेला सकाळी सुरूवात झाली.
सहा देशातील सात हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. जगातील पाचव्या क्रमांकाची अत्यंत अवघड मॅरेथॉन स्पर्धा म्हणून गणली जाते.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरच्या हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इथोपिया, केनिया, फिनलँड, जर्मन अशा अनेक देशातून 100हून अधिक स्पर्धक आले आहेत.