नाशिक : कृषी विभागाकडून देणाऱ्या येणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. कृषीक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना राज्य सरकाराच पंजाबराव कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला. पण राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारण्यास राजेंद्र पवार यांनी नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसणाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार कसा स्वीकारावा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राज्यापालांचं नाव न घेता त्यांच्यावर राजेंद्र पवारांनी टीका केली आहे. 


महाराष्ट्राच्या इतिहासावर कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात, अशा महान व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा मला असं वाटतं, हा पुरस्कार ज्या महाराष्ट्र राज्याने दिला आहे, त्यांच्या कृषीविभागाच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार स्विकारणं मला अभिमानास्पद वाटेल, राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. 


राजेंद्र पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडिल आहेत. राजेंद्र पवार यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवत कृषी क्षेत्रात काम केलं आहे.