सांगली : शेतकऱ्यांना एफआरपी न देणाऱ्या साखर कारखानदारांबाबत राजू शेट्टी खा. राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. 1 जानेवारी पासून त्यांनी मुजोर साखर कारखानदारांविरुद्ध आंदोलन पुकरले आहे. दरम्यान त्यांनी फडणवीस सरकारवरही टीका केली आहे. ऊस कारखानदारी बाबत गडकरी आणि फडणवीस यांच्यापैकी नेमके कोण खोटं बोलतंय ? हे त्यांनीच सांगावे नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साखर कारखांदारीतील काहीच कळत नसावे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर शेतकऱ्यांनी आता उस लावून नये, जर जास्त साखर तयार झाली तर भविष्यात साखर समुद्रात बुडवावी लागेल आणि कारखाने बंद पडतील. असे आंदोलन करू नये असं वक्तव्य केले होते. गडकरी यांच्या वक्तव्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी त्यांना टोला लगावला आहे.


शेतकरी हवालदील 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साखरेला मागणी नाही असे म्हणत साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांना मिळणारी एफ.आर.पी थकवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. साखर कारखान दारांनी एफ.आर.पीचे पैसे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही ते दिले न गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. बराच काळ या एफ.आर.पीची मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसतेय पण साखर कारखानदार याला दाद देताना दिसत नाहीत. आता एफ.आर.पी थकवलेल्या साखर कारखान्यांविरोधात खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.


कार्यालयावर मोर्चा 


 एफ.आर.पी थकवलेल्या या साखर कारखानदारांविरोधात त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. एक जानेवारीपासून या मुजोर साखर कारखानदारांविरोधात आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये पहिला मोर्चा कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं खासदार राजू शेट्टींनी सांगितले आहे.


'आधी शेतकऱ्यांचे पैसे द्या'


 ऊस दार नियंत्रण १९६६ नुसार साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची एफ आर पी देणं बंधनकारक असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. साखरेला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे देता येत नसले, तर आधी सरकारचा कर आणि व्याजाचे हप्ते थांबवून शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखानदारानी देण्याची मागणी शेट्टींनी केली.