सांगली : मंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतंच चाललाय.


शेट्टी सांगली जिल्ह्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने खासदार राजू शेट्टींना ताकारीमध्ये येऊन दाखवा, असं आव्हानच दिलं होतं. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांच्या सांगली जिल्ह्यात खासदार राजू शेट्टी यांनी दमदार एन्ट्री केली आहे.


तासगाव - कराड महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या बैठकीसाठी राजू शेट्टी आज सांगली जिल्ह्यातील ताकारी या गावी आले होते. खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा तैनात होता. खासदार राजू शेट्टींच्या गाडीसमोर पुढे बाईकवर कार्यकर्ते तैनात होते... तर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात होता. 


चुकीच्या पद्धतीने केलेल्या महामार्गाच्या आखनीमुळे शेतकऱ्यांचं होणाऱ्या नुकसानी संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राजू शेट्टी हजर झाले होते.


काय आहे शेतकऱ्यांचं म्हणणं...


तासगाव - कराड महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. चुकीच्या पद्धतीने केलेल्या महामार्गाच्या आखणीमुळे जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. सांगली जिल्ह्यातील दयारी, तुपारी, घोगाव यातील ६४ शेतकऱ्यांच्या ५८ एकर बागायत शेतीचं नुकसान होणार आहे.


जुन्या मार्गावरून सरळ रस्ता करण्याऐवजी 'एस' आकराच्या वळणाचा रस्ता धयारी, तुपारी, घोगाव या ठिकाणाहून करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे सरळ मार्गाने रस्ता करावा, या मागणीसाठी आज खासदार राजू शेट्टी, शेतकरी आणि अधिकारी यांच्यात आज बैठक झाली.


तर या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामादरम्यान शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा, विकासाच्या नावावर शेतकरी बरबाद होत असेल आणि जबरदस्तीने कुणी जमीन अधिग्रहण करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.