सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty, president of Swabhimani Farmers Association) चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर घणाघात केला. शेतकऱ्यांचा पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे(Maharashtra Politics). 
संघर्ष केल्या शिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. शेतकऱ्यानं लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा आरोप राजी शेट्टी यांनी केला आहे. 
राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळेच दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याला संघर्ष करावाच लागतो. राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. यावरूनच या सरकारची नितीमत्ता दिसून येत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. 


एफआरपीचा कायदा रद्द करावा


 मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये, दोन तुकड्यातील एफआरपीचा केलेला कायदा रद्द करून पुन्हा एक रकमी करावे. काटामारी संपुष्टात आणण्यासाठी साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाईन करावेत. 


शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या


मागील वर्षाची एफआरपी + 200 रूपये तातडीने द्यावेत. सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत. गतवर्षीच्या सरासरी रिकव्हरीनुसार चालू हंगामात एक रक्कमी एफआरपी आणि हंगाम संपल्यानंतर 350 रूपये उचल द्यावी. तोडणी मशिनने तुटलेल्या ऊसाला पालापाचोळ्याची कपात 4.50 टक्याऐवजी 1.50 टक्के करावी आदी मागण्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केल्या आहेत. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट साखर आयुक्त कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्याचे दिवेदन दिले. या मोर्चात स्वत: राजू शेट्टी सहभागी झाले होते.  सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मोठा मोर्चा काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.