कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मात्र, राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.  दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या कारणावरुन राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुधाला अनुदान मिळावे यासाठी  राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याच्या शिवारातून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकारने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे अन्यथा आमची जनावर संभाळावीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. अनुदान तातडीने मिळावे यासाठी १७ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.


राज्य सरकार, केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, दुग्ध विकासमंत्री यांच्याशी आपण संपर्क केला पण कोणीही दाद घेतली नाही, असा थेट आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले आहे. राज्य सरकारलाही पत्र पाठविले आहे. मात्र, कोणाकडूनही काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्याला न्याय मिळावा, एवढीच आपली मागणी आहे, असे शेट्टी म्हणालेत.