मुंबई : Rajya Sabha election: Shiv Sena Rajya Sabha candidate :राज्यसभा निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आपला  6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. यामुळे संभाजीराजे यांचा मार्ग खडतर झाला आहे. शिवसेनेना पुरस्कृत उमेदवार देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यांच्यापुढे ठेवण्यात आलेली ऑफर ते स्विकारणार का, याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची महत्वाची चर्चा झाली. यावेळी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार अर्ज दाखल करणार, हे निश्चित झाले. राज्यसभेसाठी अपक्ष किंवा शिवसेना पुरस्कृत उमेदवार नसणार आहे.


संभाजीराजे यांनी प्रवेश शिवसेनेत प्रवेश केला तरच राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. पण अपक्ष म्हणून किंवा पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला जाणार नाही, यावर आता ठाम आहे. यामुळं संभाजीराजे यांचा मार्ग खडतर झाला आहे.


दरम्यान, संजय राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे दुसरे अधिकृत उमेदवार कोण असणार याचीही उत्सुकता आहे. दुसऱ्या उमेदवारीसाठी मोठी चुरस आता वाढली आहे. संभाजीराजे छत्रपती किंवा कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यापैकी एकाची अधिकृत उमेदवारी आज शिवसेना जाहीर करणार आहे. त्यामुळे आता उत्कंठता शिगेला पोहोचली आहे. 


दरम्यान, संभाजीराजे हे कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांनी कोल्हापूर येथे सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे आता काय निर्णय घेतात, याचीही उत्सुकता आहे.