जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी जळगावमधल्या घरी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी मुंबईला जाणार आहेत. याबाबत जळगावात एकनाथ खडसेंना विचारलं असता लग्नाला जातोय येता का ? असा सवाल त्यांनी केला.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदींविरोधात घोषणाबाजी केली. खडसेंना ज्या भोसरी प्रकरणात ईडीची नोटीस बजावलीय, त्या प्रकरणी यापूर्वीच चारवेळा चौकशी झालीय. तरीही पुन्हा ईडीची नोटीस देऊन भाजप राजकारण करतंय असा आरोप यावेळी केला. नोटीस तातडीनं मागे घेण्याची मागणीही केली आहे.