मुंबई : गो कोरोना, कोरोना गो असे म्हटल्याने सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. सगळीकडे त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतायत. गो कोरोना म्हणून कोरोना जात नसल्याची टीका देखील त्यांच्यावर होत आहे. या सर्व टीकेला रामदास आठवले यांनी आपल्या खाश शैलीत उत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना गो का मैने ये दे दिया था नारा...इस लिए जाग गया था भारत सारा अशा काव्यपंक्तीत आठवलेंनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. कोरोना ये 110 देश मे चमक रहा है सारा..कोरोना बहुत देश मे चमक रहा है सारा...मै एक दिन बजा दुगा कोरोना के बारा...अशी ओळ देखील त्यांनी जोडली आहे. त्यामुळे त्यांची ही कविता देखील सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरणार आहे.


'गो कोरोना'वर स्पष्टीकरण 



कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे आतापर्यंत १७ रुग्ण आढळले आहेत. यासाठी सरकारतर्फे निर्देश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल होतेय. त्यात ते गो कोरोना, कोरोना गो असे म्हणत आहेत. 


कोरोनाचा आवर घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना आठवलेंची ही क्लीप हास्याचा विषय ठरत आहे. असं गो कोरोना म्हणून कोरोना जात नसतो अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहे. यावर आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गो कोरोना म्हणण्याचा माझा उद्देश वेगळा होता असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असेही ते म्हणाले.