मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीसांनी राणा दाम्पत्यावर आणखी काही गुन्हे दाखल केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर गुन्हा नोंदवण्याची तक्रार शिवसेनेने उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात केलीय. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी राणांवर गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली  आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले आणि दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचं वातावरण निर्माण करत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप त्यांनी केलाय. जर गुन्हा दाखल केला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.


राणा दाम्पत्यावर आणखी एक गुन्हा दाखल-सूत्र


सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणांवर 353 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे.