पुणे : खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही खंडणी चक्क माहिती अधिकार कार्यकर्ता आणि त्याच्या साथीदारांनी मागितल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यवयायिकाकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर या व्यावसायिकांने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासाची सूत्रे हलल्यानंतर एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह पाच जणांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यवसायिक सुधीर कर्नाटकी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, कथित पत्रकार देवेंद्र जैन, कर्नाटकी यांची मैत्रीण दीप्ती आहेर आणि त्यांचा साथीदार अमोल चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 



बराटे आणि इतरांनी दीप्ती आहेर यांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक कर्नाटकी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी तसेच रास्ता पेठेतील भूखंडाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून जगताप आहेर आणि जैन या तिघांना अटक करण्यात आली आहे.