औरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांवर बलात्काराचा गुन्हा
औरंगाबादचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.
औरंगाबाद : औरंगाबादचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एमपीएसीच्या मार्गदर्शनासाठी घरी बोलावून बलात्कार केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनंच दाखल केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पीडितेने व्हाट्सअॅप वरून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.