मुंबई : पालघर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. ही घटना डहाणू येथील आगर या गावात घडली. या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडपाच्या ठेकेदाराचा शोध पोलीस घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंडपात पुजा करण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीवर एका 24 वर्षीय युवकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती पालघर पोलिसांकडून अधिकृतपणे देण्यात आलेय. पालघर पोलीस प्रवक्ते हेमंत कुमार काटकर यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री घडली. जेव्हा 13 वर्षीय मुलगी आणि इतर मुलांसह दहाणू परिसरातील आगर गावात गणपती दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी पुजा करत होती.


अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी आहे. गणपती मंडपाचा ठेकेदार आहे. त्याने मुलीला काही बहाण्याने मंडपातून बाहेर आणले. त्यानंतर त्याने बलात्कार केला आणि तेथून तो पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


काटकर यांनी सांगितले की, या घटनेनंतर मुलीने आपल्या पालकांना सांगितले. अल्पवयीन मुलीला घेऊन पालक पोलीस ठाण्यात पोहोचलेत. डहाणू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्या विरोधात कलम 376 (बलात्कार) आणि बाल संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार बाल लैंगिक अत्याचारांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.