पुणे : पुण्यात कोंढवातील मिठानगरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणातल्या सहा पैकी पाच आरोपी अल्पवयीन आहेत. एक आरोपी 19 वर्षाचा असून उरलेल्या आरोपींची वय ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही. 


सहा आरोपींमध्ये दोन आरोपी १० वर्षाचे आहेत.तर ६ वर्ष ९ महिने वयाचाही एक आरोपी आहे. यासर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


मुलीची आजी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर हा प्रकार उघड झालाय. कोंढवा परिसरातली ही नजीकच्या काळातली दुसरी घटना आहे.