उल्हासनगर : एका अल्पवयीन मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. घटनेनंतर या भागात अनेकांना धक्का बसला आहे.


रिक्षा चालकाला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार करणारा नराधम राहुल जाधव हा रिक्षा चालक आहे. नराधम राहुल हा पीडित मुलीच्या परिसरात राहणारा असल्याने पीडितेचे आई वडील त्याच्या रिक्षातून प्रवास करीत असत. याच दरम्यान ओळखीचा फायदा घेत पीडित आजारी असताना तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागवली. मात्र यावेळी त्याने पीडित मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अॅम्ब्युलन्समध्येच बलात्कार केला.


गर्भवती झाल्याने आलं समोर


पीडित मुलीच्या आईला तिच्यात शारीरिक बदल जाणवले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीच्या कुटुंबीयांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार दिल्यानंतर नराधम राहुल विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.