तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाखही लुटले
पोलीस असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधून महिलेला सव्वा दोन लाखाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.
पुणे : पोलीस असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधून महिलेला सव्वा दोन लाखाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.
स्वप्निलकुमार शहाजी थोरात (रा.आळंदी, ता. खेड, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित महिला विवाहित असून लघुउद्योजक आहे. आरोपीदेखील विवाहीत असून तो फायर ब्रिगेडमध्ये नोकरी करतो.
या दोघांची काही कामानिमित्त भेट झाली होती. वाढलेल्या ओळखीनंतर त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तरुणाने आपल्याकडील सव्वादोन लाख रुपये घेतल्याचेही यात म्हटले आहे.