VIDEO : कोळ्याच्या जाळ्यात अडकली देव चिमणी
वन विभागाच्या कर्मचा-यांना हा अडकलेला पक्षी आढळून आला.
मुंबई : कोळ्याच्या जाळ्यात छोटे मोठे कीटक अडकलेले आपण बघितले आहेत. मात्र मेळघाटाच्या जंगलात एक मोठा पक्षीच कोळ्याच्या जाळ्यात अडकल्याचं समोर आलं आहे. चिखलद-याजवळच्या जंगलात वन विभागाच्या कर्मचा-यांना हा अडकलेला पक्षी आढळून आला.
'जायंट वूड स्पायडर नेफिलापेलिप्स'च्या जाळ्यात हा पक्षी अडकला होता. देव चिमणी नावाच्या पक्ष्याचा मृत्यू कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यानं झाला आहे. मेळघाटमधील सीमाडोह परिसरातील कुवापाटी ते बिच्छुखेडादरम्यान एका झाडावर हे जाळं तयार करण्यात आलं होतं.
यापूर्वी वटवाघूळ जायंट वूड स्पायरडच्या जाळ्यात अडकल्याचं आढळून आलं होतं. मात्र पक्षीत कोळ्याचा जाळ्यात अडकल्याची भारतातील ही दुर्मिळ घटना असल्याचं म्हटलं जात आहे.
मेळघाटात जायंटवूड स्पायडरची संख्या जास्त आहे. मुळात भारताबाहेर या कोळ्याच्या जाळ्यात पक्षी अडकल्याची नोंद यापूर्वी करण्यात आली होती. पण, मेळघाट परिसरातील ही पहिलीच घटना आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याची माहिती पक्षी तज्ज्ञ डॉ. अतुल बोडखे यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.