औरंगाबाद : भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारने टू व्हीलर ढकलत नेणाऱ्या एका तरुणाला फुटबॉलसारखे उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या धडकेत सिद्धार्थ थोरात हा तरुण जागीच ठार झाला. हा भीषण अपघात काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बीड बायपासवरील महानुभाव चौकाजवळ झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर थरकाप उडतो. 


टू व्हीलरने शहरात जात होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्याच्या बाजूने चाललेल्या तरुणाला फुटबॉलसारखे कारने उडवले. मृत सिद्धार्थचे वडील संजय थोरात यांचा कांचनवाडी येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. हॉटेलचा व्यवसाय आटोपून सिद्धार्थ कांचनवाडीतून टू व्हीलरने शहरात जात होता. त्याचवेळी महानुभाव आश्रम चौकाजवळ टू व्हीलरचे चाक पंक्चर झाल्याने ढकलत बीड बायपासकडे निघाला होता. तेवढ्यात सुमारे १२० च्या वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने सिद्धार्थला उडवले.



फुटबॉलसारखा २० फूट उंच उडाला


तो फुटबॉलसारखा २० फूट उंच उडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या शटरवर धडकला. तेवढ्यावर ही स्विफ्ट कार थांबली नाही. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या इंडिका कारवर जाऊन आदळली. स्विफ्टचा चालक मंगेश श्रीराम मुळे याच्या विरोधात सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.