COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : रत्नागिरीतही मान्सून पूर्व पावसाने पहिला बळी घेतलाय. अंगावर वीज पडून हातखंबा तारवेवाडी इथं २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. पंकज घवाळी अस मृत तरुणाचं नाव आहे. दुपारच्या सुमारास वाड्याच्या बाहेर उभा असणाऱ्या पंकज घवाळीच्या अंगावर वीज कोसळली तसेच आजूबाजूच्या घरातील वायरिंग देखील जळून खाक झालीय.


रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावाला. 


चक्रीवादळामुळे आंगवली गावात असंख्य वृक्ष तुटून पडले. तसंच ४० पेक्षा अधिक घरांचे नुकसान तर १०० पेक्षा अधिक झाडं कोसळली. १० विजेचे खांब तुटले असून यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित पूर्णपणे खंडित झाला. ग्रामपंचायत - शाळा आणि अनेक घरांचं लाखोंचं नुकसान या चक्रीवादळामुळे झालं. यानंतर महसूल विभागानं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. 


या वादळामुळे झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे देवरुख-मार्लेश्वर रस्ता बंद पडला होता. मात्र, ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांनी झाडं बाजूला करून मार्ग खुला करण्यात आला.