COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : गडचिरोलीमधील स्थानिकांची नक्षलवाद्यांमध्ये होणारी भरती आता पूर्ण थांबली आहे, असा दावा गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केलाय....सरकारला असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे गडचिरोलीमधील माओवादीविरोधी मोहिम शक्य झाल्याची माहिती केसरकर यांनी दिलीय... महाराष्ट्रप्रमाणे शेजारच्या राज्यांनीही माओवाद्यांविरोधी मोहिम उघडावी तर आणखी मोठं यश मिळू शकेल, असा दावा दिपक केसरकर यांनी केलाय. रत्नागिरी मांडवी पर्यटन महोत्सवासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.