तुम्ही पर्यटनाला जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!
रत्नागिरीतील ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा या हॉटेलमध्ये पैशाचा फ्रॉड झाला.
Ratnagiri : तुम्हाला पर्यटनाची आवड असेल किंवा व्यवसायानिमित्ताने कोठे बाहेर जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रत्नागिरीतल्या गणपतीपुळे (Ganpatipule ) येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलमध्ये (Greenleaf Resort Hotel) गेल्या काही दिवसापासून लोकांची फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच आता आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) मधली आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरांच्या (Madhurani Prabhulkar) पतीचीही फसवणूक झाल्याचं समोर आले आहे.
रत्नागिरीतील ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा (Green Leaf Resort & Spa) या हॉटेलमध्ये पैशाचा फ्रॉड झाला. यामध्ये मराठी दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि वीणा बर्दापूरकर या दोघांचे 1 लाख 75 हजार रूपये लूबाडण्यात आले. हॉटेलच्या अॅपवर पाठवलेली रक्कम कुणा भलत्याच्याच खात्यावर गेली आहे. गुगल अकाऊंटवरून या ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा (Green Leaf Resort & Spa) या हॉटेलची माहिती घेऊन त्यावर त्यांनी पेमेंट केलं. मात्र तेथे पोहचल्यावर त्या हॉटेलच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचं कळलं. अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचं प्रमोद प्रभूलकर यांनी सांगितलं. म्हणून ऑनलाईन पेमेंन्ट (online payment) करताना सावधानी बाळगने गरजेचे आहे.
hotel_fraud प्रमोद प्रभुलकर (Pramod Prabhulkar) आणि वीणा बर्दापूरकर (Veena Bardapurkar) या दोघांची रत्नागिरीतील ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा गणपतीपुळे रत्नागिरी येथे हॉटेलमध्ये पैशाचा फ्रॉड झाला असून प्रमोद प्रभुलकर यांचे 17 हजार रूपये आणि वीणा बर्दापूरकर यांचे 1 लाख 60 हजार रूपये रक्कम कुणा भलत्याच खात्यावर गेल्याचे. गुगल अकाऊंटवरून या ग्रीन लिफ रिसॉर्ट एन्ड स्पा या हॉटेलची माहिती घेऊन त्यावर त्यांनी पेमेंट केले मात्र तेथे पोहचल्यावर तेथे त्या हॉटेलच्या खात्यावर रक्कम जमा झालीच नसल्याचे कळले.