प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीकर सध्या भटके कुत्रे आणि गुरांच्यामुळे उपद्रवामुळे हैराण झालेत...रत्नागिरी शहरातील प्रत्येक नाक्या नाक्यावर गुरे आणि कुत्र्यांच्या वावर वाढलाय. याचा रत्नागिरीकरांना प्रचंड त्रास होतोय..भटक्या कुत्र्यांची संख्याही रत्नागिरीत झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलंय. शहरातील कोकण नगर, उद्यम नगर, बाजारपेठ आणि आठवडा बाजार परिसरात कुत्रे मोठ्या प्रमाणात आहेत...रात्रीच्या वेळी तर हे भटके कुत्रे शहरभर उच्छाद मांडत असल्याचे स्थानिक सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला भटक्त्या कुत्र्यांचा एवढा त्रास व्हायला लागलाय की गाडी चालवत असताना मरता मरता वाचलोय. लहान मुलांना शाळेत नेताना कुत्र्यांचा खूप त्रास होतोय असे स्थानित संजय गुरव यांनी झी २४ तासला सांगितले. नगेपरिषदेन उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, तसेच गुरांचा ही खूप त्रास जाणवतोय रस्तोरस्ती गुरे बसलेली असतात मोठ्या गाड्या ही पास व्हायला त्रास होतो. अपघात होण्याची शक्यता असते. त्याचाही विचार करावा असेही ते सांगतात.


नगर परिषदेकडून शहरातील मोकाट गुरांना पकडलं जायचं त्यांच्या मालकांवर कारवाई व्हायची मात्र आता ही कारवाईही बंद आहे.  नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे... कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम देखील बंद करण्यात आलीयं. त्यामुळे ही कारवाई पुन्हा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 



कुत्र्यांचा त्रास म्हणजे गाडी चालवत असताना मला रात्रीच्या वेळी अचानक आडवी आल्यामुळे मी पडलोय तरी नगरपरिषदेणं याकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक राजेश निमरे यांनी केली आहे.


मोकाट जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रत्नागिरीकांनी केलीये खरी आता नागरिकांची ही समस्या नगर परिषद प्रसासन कशा पद्धतीनं सोडवते याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.