रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा लिलाव १ कोटी ८० लाख रूपयांना झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव हा केला जाणार आहे. अॅटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदच्या खेड येथील तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे असं सांगितलं जातं की दाऊद या बंगल्यात अनेक वेळा येऊन राहत असे. या मलमत्तांमध्ये एक पेट्रोलपंप सोबत एक फ्लॉट देखील आहे. पुण्यातील मुल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या मलमत्तांची किंमत ठरवण्यास अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितलं आहे.


खेडमधील मुख्य मालमत्ता ही हसीनाच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना यांच्या नावे आहे. हे सगळे लोक १९८० दशकात खेडच्या बंगल्यात यायचे, अशी माहिती देण्यात आली आहे.