Ratnagiri Rain News :  रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने दोन वाहने रुतून बसली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. दरम्यान, येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी वाहतूक लांजा- दाभोळमार्गे सुरु करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळ मार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम केल्याने राज्यमहामहामार्ग 166 यावर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून रस्ता सुरळीत सुरु झाला आहे.रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका रस्ता वाहतुकीला बसला होता. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर  ( Kolhapur - Ratnagiri Highway) नाणीज येथे रस्ता खचल्याने दोन ट्रक महामार्गावरच फसले होते. रस्त्याच्या मध्ये ही वाहने अडकल्याने रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नाणीज शाळेजवळचा रस्ता काल रात्री खचला. आठ तासाहून अधिक काळापासून वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प होती.


रत्नागिरीत मिऱ्या ते नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण


रत्नागिरीत मिऱ्या ते नागपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने रस्ता खचण्याचा प्रकार पुढे आला आहे. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. केवळ लहान वाहनांची वाहतूक सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती असल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनाधारकांना गाड्या चालवणे कठिण होत आहे. मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट 



मुंबई गोवा महामार्गाला दणका, हातखंबा ते निवळी यादरम्यान रस्ता खचला


दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसाने काल मुंबई गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु असताना रस्ता खचला आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काल या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. मात्र, पाऊस कोसळत असल्याने पुन्हा येथील रस्ता खचण्याचा धोका आहे. बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. तो अद्याप सुरुच आहे. 



 मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने मुसळधार पावसाने चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सध्या एका बाजूने वाहतूक सुरु आहे. मात्र मातीचा भराव वाहून जाण्याचा धोका पावसामुळे आहे. तसे झाले तर महामार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. 


दरम्यान, याआधी पावसाने तडाखा दिल्याने आंबा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे रत्नागिरी - कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली होती.  (Rain In Konkan)  दरड बाजुला केल्यानंतर कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील ( Kolhapur - Ratnagiri road) आंबा घाट  ( Amba Ghat) वाहतुकीला सुरु झाला आहे. ( Amba Ghat traffic )